तरुणीची छेडखानी, युवकाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 29, 2016 18:13 IST2016-07-29T18:13:25+5:302016-07-29T18:13:25+5:30

तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून तिची छेडखानी करणाऱ्या युवकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girlfriend's molestation, crime against young man | तरुणीची छेडखानी, युवकाविरुद्ध गुन्हा

तरुणीची छेडखानी, युवकाविरुद्ध गुन्हा

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २९ : तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून तिची छेडखानी करणाऱ्या युवकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील संजयनगर भागात राहणारी २० वर्षीय तरुणीला त्याच भागात राहणारा शाकिर शकिब मक्राणी (२४) हा त्रास देत होता. तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्या पाठलाग करणे, अश्लिल शेरेबाजी करणे असे प्रकार करून तरुणीला त्रास दिला जात होता. तरुणीने दुसरीकडे लग्न केल्यास तिचा लग्नाचा मंडप जाळून टाकण्याचीही धमकी त्याने दिली.

याविरुद्ध तरुणीने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शाकीर शकिब मक्राणी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Girlfriend's molestation, crime against young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.