‘व्हॅलेंटाइन’च्या पार्टीनंतर मित्रानेच केला बलात्कार

By Admin | Updated: February 15, 2016 04:06 IST2016-02-15T04:06:39+5:302016-02-15T04:06:39+5:30

व्हॅलेंटाईन डेनिमित्त मैत्रिणीने आयोजित केलेल्या पार्टीनंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास अ‍ॅमोनरा येथे घडली

Girlfriend raped by Valentine's party | ‘व्हॅलेंटाइन’च्या पार्टीनंतर मित्रानेच केला बलात्कार

‘व्हॅलेंटाइन’च्या पार्टीनंतर मित्रानेच केला बलात्कार

पुणे : व्हॅलेंटाईन डेनिमित्त मैत्रिणीने आयोजित केलेल्या पार्टीनंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास अ‍ॅमोनरा येथे घडली. याप्रकरणी २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.
याप्रकरणी फिरोज महम्मद शेख (२३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. मूळची कलकत्ता येथे राहणारी ही तरुणी सध्या अ‍ॅमोनरा पार्कमध्ये तीन मैत्रिणींसह राहते. व्हॅलेंटॉइन डे असल्याने तिने तिच्या दोन मित्रांना पार्टीसाठी घरी बोलवले होते. रात्री ९ वाजता सुरू झालेली पार्टी पहाटे २ वाजता संपली. त्यानंतर ती तरुणी बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली असताना, हॉलमध्ये झोपलेल्या मित्र फिरोजने बेडरूममध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला.

Web Title: Girlfriend raped by Valentine's party