तिहेरी हत्याकांडाप्रकरणी प्रियकरास अटक

By Admin | Updated: August 19, 2015 01:06 IST2015-08-19T01:06:44+5:302015-08-19T01:06:44+5:30

दोन मुलांसह महिलेच्या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्यास बेळगाव पोलिसांना यश आले. विवाहितेच्या प्रियकराने हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Girlfriend arrested for looting | तिहेरी हत्याकांडाप्रकरणी प्रियकरास अटक

तिहेरी हत्याकांडाप्रकरणी प्रियकरास अटक

बेळगाव : दोन मुलांसह महिलेच्या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्यास बेळगाव पोलिसांना यश आले. विवाहितेच्या प्रियकराने हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी सोमवारी प्रवीण भट्ट (२३) यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री रीना मालगत्ती (३७) या विवाहितेचा गळा चिरून, तर मुलगा आदित्य (१२) आणि मुलगी साहित्या (५) यांचा बादलीत बुडवून आणि गळा दाबून निर्घृण खून झाला होता. रीनाचा पती राकेश मालगत्ती बाहेरगावी गेला होता, त्याच रात्री तिघांचा खून झाला.
रीना हिचे शेजारी राहणाऱ्या प्रवीण भट्ट या महाविद्यालयीन युवकाबरोबर अनैतिक संबंध होते. शनिवारी मध्यरात्री रीनाने पती राकेश घरी नसल्याने प्रवीणला फोन करून घरी बोलावले. ते दोघे गच्चीवर बराच वेळ बोलत बसले होते. नंतर प्रवीण त्याच्या घरी गेला. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण गच्चीवरून पुन्हा रीनाच्या घरी आला. त्याने रिनाला अनैतिक संबंध संपवूया, असे सांगितले. मात्र तिने पतीस सोडण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात प्रवीणने रीनाच्या गळ्यावर चाकूचा वार केला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. बाजूला झोपलेले आदित्य आणि साहित्या यांनाही त्याने संपविले, असे पोलीस आयुक्त एस. रवीकुमार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Girlfriend arrested for looting