‘त्या’ विद्यार्थिनीवर पाच महिन्यांपासून अत्याचार

By Admin | Updated: June 7, 2017 02:35 IST2017-06-07T02:35:43+5:302017-06-07T02:35:43+5:30

अंधेरीतील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली

'That' girl was tortured for five months | ‘त्या’ विद्यार्थिनीवर पाच महिन्यांपासून अत्याचार

‘त्या’ विद्यार्थिनीवर पाच महिन्यांपासून अत्याचार

मुंबई : अंधेरीतील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली असताना, जानेवारी महिन्यापासून या मुलीवर अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी पूर्वेकडील परिसरातील शाळेत ही साडेतीन वर्षांची चिमुरडी शिक्षण घेते. १८ मे रोजी मुलीच्या बदललेल्या स्वभावामुळे कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने शाळेच्या विश्वस्त आणि शिक्षकाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. शाळेतील एका शिक्षिकेने आपल्याला आणि आणखी एका मुलीला शाळेच्या विश्वस्तांच्या खोलीमध्ये नेले. तेथे विश्वस्ताने आपल्यासोबत घाणेरडे चाळे करत अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून शाळेच्या विश्वस्तासह एका शिक्षिकेविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तपासात जानेवारी महिन्यापासून अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्यासह शाळेतील अन्य काही मुली विश्वस्ताच्या अत्याचाराच्या बळी ठरल्याच्या संशयातून त्यांच्याकडेही विचारपूस सुरू आहे. दरम्यान, शाळेचा विश्वस्त जर्मन नागरिक असल्याने त्याने पळ काढला आहे.

Web Title: 'That' girl was tortured for five months