मुलगी पळवून नेल्याने, मेहकरमध्ये घरांची तोडफोड

By Admin | Updated: February 16, 2017 04:29 IST2017-02-16T04:29:45+5:302017-02-16T04:29:45+5:30

मुलगी पळवून नेल्याने काठ्या, तलवार, दगड घेऊन संतप्त झालेल्या एका समाजातील लोकांनी सोमवारी रात्री

The girl was abducted, Mehkar sacked the house | मुलगी पळवून नेल्याने, मेहकरमध्ये घरांची तोडफोड

मुलगी पळवून नेल्याने, मेहकरमध्ये घरांची तोडफोड

मेहकर (बुलडाणा) : मुलगी पळवून नेल्याने काठ्या, तलवार, दगड घेऊन संतप्त झालेल्या एका समाजातील लोकांनी सोमवारी रात्री येथील दुसऱ्या समाजातील लोकांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. मेहकर पोलिसांनी २७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
स्थानिक गवळीपुरा येथील एका मुलीला विशाल जेधे याने प्रेमप्रकरणातून सोमवारी पळवून नेल्याची घटना घडली. त्यानंतर मुलीकडील समाजातील काही मंडळी संतप्त झाली. त्यांनी काठ्या, तलवारी, दगड, विटा घेऊन सोमवारी रात्री वाल्मीक नगरात जाऊन सुनिल रतन ढंढोरे, शामचरण टाक, योगेश पचेरवाल, संदीप टाक, मंगलसिंग जेधे यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली, अशी तक्रार सुनिल ढंढोरे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The girl was abducted, Mehkar sacked the house