धमकावून शाळकरी मुलीवर केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:45 IST2016-09-10T02:45:55+5:302016-09-10T02:45:55+5:30
तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे अलिल चित्रिकरण करून तिला धमकावून बलात्कार करणाऱ्या ४५ वर्षीय इसमाला तुळींज पोलिसांनी अटक केली

धमकावून शाळकरी मुलीवर केला बलात्कार
विरार : तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे अलिल चित्रिकरण करून तिला धमकावून बलात्कार करणाऱ्या ४५ वर्षीय इसमाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता अंघोळ करत असताना आरोपीने मोबाईलमध्ये तिचे चित्रिकरण केले होते.
पीडित मुलगी नालासोपारा पूर्वेस चाळीत राहते. त्यांचे न्हाणीघर बाहेर आहे. मागील वर्षी ती अंघोळ करत असताना समोरच राहणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीने तिचे चित्रिकरण केले होते. ते इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तो तिच्यावर सतत दिड वर्ष बलात्कार करीत होता. या प्रकरणाची कुठेही वाच्यता न करण्याची त्याने धमकी दिली होती. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने तिने कुटुंबियांना सांगितले. तिच्या पालकांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बलात्कार, धमकी तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपीचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले. (वार्ताहर)