लातूरमधील घटना : बहिणीवर दीड वर्षांपूर्वी झाला होता बलात्कारलातूर : दीड वर्षांपूर्वी बहिणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या एका २९ वर्षीय तरुणीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास बस पेटविली. विशेष म्हणजे बस पेटल्यानंतरही ती तरुणी आतच होती़ आगीत बसच्या पाठीमागील सहा सीट जळून खाक झाले असून, बॅटरी व अन्य वायरींग जळाली आहे़ गांधी चौक पोलिसांनी तरूणीला ताब्यात घेतले. औसा तालुक्यातील बेलकुंड येथील या तरुणीच्या बहिणीवर दीड वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता़ भादा पोलिसांत बलात्काराचा गुन्हाही नोंद असल्याचे तिचे म्हणणे आहे़ मात्र या प्रकरणात काही पोलीसच असल्याने तिला न्याय मिळत नव्हता़ बुधवारी तिने लातूर दौऱ्यावर आलेले औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांनी तिला भेटू दिले नाही़ त्यामुळे हताश झालेल्या या तरुणीने गावाकडे जाण्यासाठी बसस्थानक गाठले़तत्पूर्वी गांधी चौकापासून जवळच असलेल्या पंपावरुन ३५ रुपयांचे पेट्रोल घेतले. बसस्थानकात औसा डेपोच्या बसमध्ये ती गेली. बसमध्ये प्रवाशीही नव्हते़ त्याचा फायदा घेऊन तिने मागच्या सीटवर पेट्रोल टाकले आणि आग लावली़ काही क्षणातच बसने पेट घेतला. वाहतूक निरीक्षक व्यंकट बिरादार यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गांधी चौक पोलिसांशी संपर्क साधला़ बसस्थानकातील अन्य बसेस बाजूला घेण्यात आल्या. पोलीस आणि व अग्नीशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली़ पीडित तरुणी पेटत्या बसमध्येच थांबल्याने तिच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)माझ काय चुकलं़़़ अन्यायाविरुद्ध आवाज उठविला़़़ हे चुकलं का़़़ का माझ्याकडे पैसे नाहीत़़़ मी गरीब घरची आहे़ वशीला नाही़़़ नेमकं काय चुकलं माझं, असा मजकुर असलेली चिठ्ठी तिने बसवर चिटकविली होती़बहिणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी न्याय मिळत नसल्याने तरुणीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बुधवारी एस टी बस पेटवून दिली. यावेळी तिने बसच्या मागे आपल्या मागण्यांचा कागद चिटकविला होता.
तरुणीने बस पेटविली
By admin | Updated: May 21, 2015 02:07 IST