मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याने तरुणीची आत्महत्या
By Admin | Updated: January 10, 2016 21:34 IST2016-01-10T21:34:19+5:302016-01-10T21:34:19+5:30
आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याच्या रागातून एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे.

मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याने तरुणीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. १० - आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याच्या रागातून एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे. मृगनयनी प्रकाश पाचपिंडे असे तिचे नाव असून, ती ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयात बीसीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिचे वडील सेंट्रिंगचे काम करतात, तर आई डी. वाय. पाटील रुग्णालयात आया आहे.
सकाळी मृगनयनी घरात मोबाइलवर गाणे ऐकत असताना आईने तिला गाणे ऐकण्यास मनाई करून कॉलेजला जाण्यास सांगितले. हातातील मोबाइल काढून घेत वडिलांकडे दिला. याचा राग येऊन जोतिबा उद्यानाजवळील पवना नदीघाटावरून तिने नदीत उडी घेतली.
परिसरातील दोन तरुणांनी तिला उडी मारताना पाहिले. तिला वाचविण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेऊन काही वेळात पाण्याबाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.