अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारुन तरुणीची आत्महत्या

By Admin | Published: May 8, 2017 02:58 PM2017-05-08T14:58:19+5:302017-05-08T14:58:19+5:30

अजिंक्यतारा किल्ल्यावरुन उडी मारुन एका तरुणीनं आत्महत्या केली.

The girl commits suicide by jumping from Ajinkya Fort on the fort | अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारुन तरुणीची आत्महत्या

अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारुन तरुणीची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

सातारा, दि. 8 - येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरुन उडी मारुन एका तरुणीनं आत्महत्या केली. रागाच्या भरात तरुणीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सायली पवार असे आत्महत्या केलेल्या  तरुणीचं नाव आहे. 
 
ही तरुणी स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. ती रविवारी संध्याकाळी अचानक घरातून गायब झाली होती. त्यानंतर रागात ही तरुणी अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं जाताना पाहिल्याचं काही लोकांनी तरुणीच्या वडिलांना सांगितलं. तसंच अजिंक्यताराच्या कड्याजवळून गेलेली तरुणी संध्याकाळनंतर दिसलीच नाही.दरम्यान, महाबळेश्वरच्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीनं सोमवारी  तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Web Title: The girl commits suicide by jumping from Ajinkya Fort on the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.