बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

By Admin | Updated: February 13, 2017 03:42 IST2017-02-13T03:42:02+5:302017-02-13T03:42:02+5:30

काजूवाडीतील एका १३वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साताऱ्यातील सिद्धेश सोरटे (२८) या तरुणाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक

The girl arrested for sexually abusing the girl | बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

ठाणे : काजूवाडीतील एका १३वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साताऱ्यातील सिद्धेश सोरटे (२८) या तरुणाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
या मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत ही मुलगी कोणताही प्रतिकार करणार नाही, याचा अंदाज घेत त्याने तिच्या घरात आणि इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या एका मोकळ्या जागेत नोव्हेंबर २०१६मध्ये आणि त्यापूर्वी एकदा असा दोन वेळा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला न सांगण्याचीही त्याने तिला धमकी दिली. त्यानंतरही तिचे विवस्त्र फोटो काढण्यासाठीही त्याने तिच्याकडे तगादा लावला. या सर्व प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी या प्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, हवालदार शिवा गवते आदींच्या पथकाने शनिवारीच त्याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी गवते या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The girl arrested for sexually abusing the girl