महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:39 AM2019-07-15T11:39:38+5:302019-07-15T11:48:47+5:30

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे.

Girish Mahajan Spoke Existing seats no Change | महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भाजप आणि शिवसनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र असे असली तरीही युतीच्या जागावाटपाचा पेच कायम आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघ युतीत शिवसेनेला सुटला असतानाही भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर गेल्या ३० वर्षांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांची एकहाती सत्ता आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात घोलपांना शिक्षा झाली. त्यामुळे सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी आली. त्यामुळे त्यांनी आपले पुत्र योगेश घोलप यांना रिंगणात उतरवले आणि विजयश्रीही खेचून आणला. कधीकाळी राष्ट्रवादीत असलेल्या रामदास सदाफुले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत योगेश घोलप यांना आव्हान दिले. मात्र वडिलांप्रमाणे योगेश यांनी सुद्धा विजयाची मालिका कायम ठेवली.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये असलेले सदाफुले पुन्हा इच्छुक आहेत . मागच्यावेळी युती नसल्याने सदाफुले यांना भाजपकडून लढता आले. यावेळी मात्र युती होणार असल्याचे जवळपास निश्चीत झाल्याने, सदाफुले यांना युतीच्या जागावाटपावेळी फेरबदल होण्याची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या युतीच्या जागेत कोणतेही फेरबदल होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने सदाफुले यांची निराशा झाली आहेत तर विद्यमान आमदार असलेले योगेश घोलप यांची चिंता मिटली आहे.

मतदारसंघाचा आढावा

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात. तर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या पवन पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याकडे इच्छुक उमेदवारांना कानाडोळा करता येणार नाही. युतीत शिवसनेचे घोलप यांची उमदेवारी निश्चित मानली जात आहे. तर सदाफुले हे ऐनवेळी काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहेत. त्यातच विद्यमान तहसीलदार राजश्री अहिरराव यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युतीचा अंतिम उमदेवारी निश्चीत होईपर्यंत या मतदारसंघात इच्छुकांची चर्चा सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Girish Mahajan Spoke Existing seats no Change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.