शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:53 IST

कॅबनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

BJP Girish Mahajan ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांची जागा भाजपमधील कोणता नेता घेणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं असून सर्वांच्या सहमतीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र स्वत: महाजन यांनी प्रसारमध्यमांसमोर येत हा दावा फेटाळला असून देवेंद्र फडणवीस हेच आगामी काळातही उपमुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, "मी राज्याचा उपमुख्यमंत्री होणार, मला गृहखातं मिळणार की अन्य कोणतं खातं मिळणार, याबाबत येत असलेल्या सर्व बातम्या निराधार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री राहतील. भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर आम्ही सर्व नेत्यांनी देवेंद्रजींना सांगितलं आहे की, तुम्ही राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. ते सरकार आणि पक्षसंघटनाही उत्तमपणे चालवू शकतात," अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातही सरकारमध्ये राहावं, या मागणीसाठी आम्ही आमचे नेते अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेऊ, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.

फडणवीस-अमित शाह भेटीत काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली.  या भेटीनंतर आता फडणवीस यांचा सरकारमधून दूर होण्याचा निर्णय लांबवणीवर पडल्याचे समजते. एनडीएला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी अद्याप नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झालेला नाही. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आपण महाराष्ट्रातील स्थितीवर सविस्तर चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं काम सुरू ठेवा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान पुढील काही दिवस तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता येणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४