शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, शिकारीचा उद्देश अजिबात नव्हता; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:20 IST

मुंबई- चाळीसगावच्या वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन गिरीश महाजन धावले असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. या प्रकरणावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी स्वतःहा शाकाहारी असून आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही. ...

ठळक मुद्देबिबट्याची शिकार करणं हा माझा अजिबात हेतू नव्हता. 'मी स्वतःहा शाकाहारी असून आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही.र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई- चाळीसगावच्या वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन गिरीश महाजन धावले असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. या प्रकरणावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी स्वतःहा शाकाहारी असून आजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना रस्त्यात अचानक बिबट्या आल्याचा आरडाओरडा सुरू झाला. लोकांची आणि प्राण्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळे मी इतर अधिकाऱ्यांसह गाडीतून उतरलो. लोकांची सुरक्षा हा माझा उद्देश होता म्हणूनच खाली उतरलो. त्यामागे बिबट्याची शिकार करणं हा माझा अजिबात हेतू नव्हता. कुठलीही स्टंटबाजी मी केली नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. जर मी तेथिल परिस्थिती पाहूनही गाडीत बसून राहीलो असतो तर मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत, अशी ओरड झाली असती, लपून राहणं हा माझा स्वभाव नाहीच, म्हणून मी गाडीतून उतरून परिस्थितीला सामोरं गेलो, असंही गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत गिरीश महाजन यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिले. ते वरखेडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दीपाली जगताप व सुसाबाई भिल्ल यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी वरखेडे येथे गेले होते. यावेळी मंत्री महाजनांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या तसेच शोधमोहीम राबवून पाहणीही केली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे तळ वाढविण्यात येतील यासह राज्यभरातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुढील मोहीम राबविण्यात येईल. गरज पडल्यास मी २-३ दिवस या भागात तळ ठोकेन, असं आश्वासनही मंत्री महाजन यांनी दिलं.

नेमकं प्रकरण काय ?चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला. वनक्षेत्रातील झाडा-झुडपांमध्ये मंत्र्यांनी नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला. चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुले यांचे बळी घेतले आहे. आतापर्यंत जवळपास पाच जणांचा बळी या बिबट्याने घेतला आहे. तर १२ ते १३ जण जखमी झाले आहेत. या नरभक्षक ठरलेल्या बिबट्याच्या संचारामुळे देशमुखवाडी, वरखेड, उंबरखेड, पिंप्राळा, पिलखोड, नांद्रे, काकडणे, सायगाव, आमोदे, तामसवाडी, पिंपळवाड म्हाळसा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचx वातावरण आहे. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनleopardबिबट्या