शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:12 IST

‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे.

ठळक मुद्देचाकण येथील एका मंगल कार्यालयात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने  निर्धार मेळाव्याचे आयोजन

चाकण : ‘‘खासदार गिरीश बापट या शकुनीमामाने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवलं,’ अशी घणाघाती टीका माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण (ता. खेड) येथे केली. चाकण येथील एका मंगल कार्यालयात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने  निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, ‘खासदार गिरीषबापट म्हणजे पुणे जिल्ह्यातील शकुनीमामा आहेत. या शकुनीमामाने शिवसेनेला संपवले. पालकमंत्र्यांना मी पत्र द्यायचो, पण मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय येत नव्हता. मात्र काम मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच पदाधिकारी यांच्या नावाने पत्र द्यायची. अशा प्रकारे यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले.

आमदार सुरेश गोरे म्हणाले, ‘विधानसभेला पराभव का झाला याच्यासाठी हा निर्धार मेळावा आहे. आजची उपस्थिती पाहून मला शिवसेनेची खरी ताकद कळाली. विकास कामांबाबत तालुक्याला नवीन दृष्टीकोन दिला. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे. शिवसेनेची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. स्वत:च्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या शिवसैनिकांना ताकद द्या. यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, अरुण गिरे आदी उपस्थित होते. .............पराभव होऊन देखील पुन्हा लढण्याची ताकद म्हणजे निर्धार मेळावा. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात त्यांच्या छाताडावर बसून खासदार राहिलो. आज मी ऐशो अरामचे जीवन जगू शकतो, पण नाही माझ्यासाठी जीवाचे रान करणाºया कार्यकर्त्यांसाठी मला लढायचं आहे. त्यांना येणाºया निवडणुकांत त्यांना ताकद द्यायची आहे. शिरूरमध्ये माऊली कटके निवडणुकीला उभे राहिले होते. बाबुराव पाचर्णे यांचा जीव खालीवर झाला. बापट यांच्या सांगण्यावरून माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला. पण नंतर बापट यांना फोन केला की, खेड मधून तुमच्या अतुल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे सांगितले तर उत्तर आले, अतुल देशमुख यांचा अन माझा संपर्क होत नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले. वाशेरे-नायफड व पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटात शिवसेनेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली, हे चिंताजनक आहे. 

............

* बापट समर्थकांचे प्रत्युत्तरभारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे बहुदा महाराष्ट्रातले पाहिले जनसंपर्क कार्यालय चालू करणारे गिरीश बापटच होते. कसबा मतदारसंघ आणि पुणे शहरात भाजप आणि शिवसेना कार्यकर्ता जर कोणी एकत्र बांधून ठेवला तो बापट यांनीच. त्यामुळे आपल्या पराभवाचे खापर बापट यांच्या माथी मारून आपण आपल्या मतदारसंघातली नाराजी लपवू नका. पुणे शहराचे लोकप्रिय खासदार ’ गिरीश बापट हे शकुनीमामा नाहीत तर पश्चिम महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांना त्यांचा गड मजबूत करता आला नाही. ते स्वत: पराभूत झाले. बापट हे  ३ लाख २४ हजार मतांनी निवडून आलेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी फक्त एका जागेवर भाजपाचा उमेदवार पराभूत झाला आहे,’ असे प्रत्युत्तर बापट समर्थकांनी दिले आहे.

टॅग्स :Chakanचाकणgirish bapatगिरीष बापटShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक