नगरमध्ये गडाख यांना घरवापसीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 04:44 IST2017-02-25T04:44:59+5:302017-02-25T04:44:59+5:30

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या यशवंतराव गडाख यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संपर्क केला

Gidak's welcome to the city | नगरमध्ये गडाख यांना घरवापसीचे आवाहन

नगरमध्ये गडाख यांना घरवापसीचे आवाहन

अहमदनगर : राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या यशवंतराव गडाख यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संपर्क केला असून माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. गडाख यांनी पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला २३ तर राष्ट्रवादीला १८ जागा मिळाल्या. गेल्यावेळी राष्ट्रवादीला ३२ जागा मिळवून क्रमांक एकवर होती. यावेळी काँग्रेसने त्यांना मागे टाकले. ही बाब पक्षाला जिव्हारी लागली आहे. नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या. गडाखांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला या जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे गडाख यांना पुन्हा पक्षात आणून आपले संख्याबळ वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. गडाखांची नाराजी ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याबाबत आहे. घुले हे नेवाशात आपल्याविरोधात भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना छुपी मदत करतात, असा आरोप करत गडाख यांनी पक्ष सोडला होता. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी ही बाब पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांच्याही निदर्शनास आणली होती. मात्र पक्षाकडून कार्यवाही न झाल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला. (प्रतिनिधी)

Web Title: Gidak's welcome to the city