गुलाम अलींना सेनेची पुन्हा धमकी
By Admin | Updated: November 7, 2015 02:01 IST2015-11-07T02:01:31+5:302015-11-07T02:01:31+5:30
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविताच शिवसेनेने पुन्हा आपले विरोधाचे शस्त्र उगारले आहे. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी

गुलाम अलींना सेनेची पुन्हा धमकी
लखनौ : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविताच शिवसेनेने पुन्हा आपले विरोधाचे शस्त्र उगारले आहे. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखीच गत व्हावी अशी उत्तर प्रदेश सरकारची इच्छा असल्यास त्यांना आमंत्रण द्यावे, अशी धमकी या पक्षाने दिली आहे. ३ डिसेंबरच्या महोत्सवात गुलाम अली गाणार असल्याचे लखनौ प्रशासनाने जाहीर केले. यानिर्णयानंतर ‘जवान बलिदान देत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझलांचा आस्वाद घ्यायचा हे आम्हाला मान्य नाही, असे सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)