शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत विसंवादाचे 'भूत'; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 12:56 IST

विवेकवादाची चळवळ जनमानसात रूजविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये फूट; कार्याध्यक्षांचा अहंकार दुखावला  अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ठळक मुद्देभविष्यात दोन संघटना कार्यरत होणार असल्याचे संकेत

पुणे : विवेकवादाची चळवळ जनमानसात रूजविणा-या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे समितीमध्ये फूट पडल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकर कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक तर दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्ष अविनाश पाटील असे दोन गट पडले आहेत. कार्याध्यक्षांचा  एककल्ली कारभार आणि अहंम वृत्ती याबाबत  कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे भविष्यात दोन संघटना कार्यरत होणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत.                 गेल्या दीड ते दोन वर्षांपासून समितीच्या कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू होती. अविनाश पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर समितीचा कारभार कसा असावा आणि त्याचे आर्थिक नियोजन कसे असावे यावरूनच मतभेदाला सुरूवात झाली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनीही समितीमधील या अंतर्गत वादाबाबत ‘लोकमत’ शी बोलताना दुजोरा दिला आहे.  ते म्हणाले, संघटनात्मक काम म्हटलं की मतभिन्नता असणारचं. हेच लोकशाहीचे लक्षण आहे. पण विवेकवादी मार्गातून सर्वांच्या मताच्या आदर राखणे हेच विचार डॉ, नरेंद्र दाभोलकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये रूजवले होते. मात्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची कार्यपद्धती अशी होती की कुणी विरोधी मत व्यक्त केलं तर त्याला बाहेर काढणं. एकप्रकारे त्यांचा एककल्ली कारभार सुरू होता. माध्यमांमध्ये दाभोलकर कुटुंबीय सातत्याने प्रकाशझोतात येते हे पाटील यांना खपत नव्हते. मला महत्व न देता त्यांना दिलं जातंय. यातून त्यांच्यात अहंकार सातत्याने डोकावत होता. अविनाश पाटील यांनी कितीतरी गोष्टी आमच्या मनाविरूद्ध केल्या. पण आम्ही काही बोललो नाही. सगळं आपल्या हातात असलं पाहिजे असे त्यांना वाटत आहे. यापूर्वीही श्याम मानव यांच्या अशाच कार्यपद्धतीमुळे समितीमध्ये फूट पडली. त्यांनी समितीची कार्यकारिणी बरखास्त केली आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मग कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहून दीड ते दोन वर्षांनी वेगळी संघटना उभी केली. श्याम मानव यांनी स्वत:ची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत ठेवली. समितीचे काम हे संघटनात्मक आहे. इथे कुणीही छोटं किंवा मोठं नाही. --------------------------------------------- संघटनेचे वादविवाद हे अशा पद्धतीने समोर येणं हे निश्चितच खेदजनक आहे. हे वाद संघटनेच्या अंतर्गत पातळीवर सुटावेत असे आमचे मत आहे. या वादावर अधिक काही बोलणं हे योग्य ठरणार नाही. आम्ही लवकरच संघटनेच्या माध्यमातून आमची भूमिका मांडू- डॉ. हमीद दाभोलकर ----------------------------------------------- माझी जी काही भूमिका आहे ती मी लवकरच माध्यमांसमोर मांडेन. मात्र आत्ता याबाबत काही सांगू शकत नाही- अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस -----------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर