घाटकोपरमध्ये भीषण आग, १ जखमी
By Admin | Updated: October 31, 2015 08:59 IST2015-10-31T08:56:07+5:302015-10-31T08:59:05+5:30
घाटकोपर रेल्वे स्टेशजवळ असलेल्या कापडाच्या गोदामाला आग लागून अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे

घाटकोपरमध्ये भीषण आग, १ जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१- घाटकोपर रेल्वे स्टेशजवळ असलेल्या कापडाच्या गोदामाला आग लागून अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या व चार वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.
घाटकोपर पश्चिमेकडील सर्वोदय रुग्णालय परिसरातील युनिव्हर्सल मिलच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. धुराचे लोट स्टेशन परिसरातही पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र यात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावलर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.