घाटकोपरमध्ये महापालिका रुग्णालयात भोंगळ कारभार, बंद लिफ्टमध्ये रुग्ण तासभर अडकले
By Admin | Updated: October 19, 2016 13:47 IST2016-10-19T13:45:58+5:302016-10-19T13:47:11+5:30
घाटकोपरमधील भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने काही रुग्ण व लहान मुलं सुमारे तासभर अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.

घाटकोपरमध्ये महापालिका रुग्णालयात भोंगळ कारभार, बंद लिफ्टमध्ये रुग्ण तासभर अडकले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात असलेल्या संत मुक्ताबाई रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने काही रुग्ण व लहान मुलं सुमारे तासभर अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. मात्र तासाभरानंतर कोणीही त्यांच्या मदतीस न आल्याने तणाव निर्माण झाला. अखेर नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यानंतर काही नर्सनी तेथे धाव घेऊन कोणत्याही साधनांशिवाय लिफ्ट उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
या सर्वांत सुमारे दोन तासांचा अवधी गेल्यानंतर अखेर तेथे एका इलेक्ट्रिशियन आला व त्याने लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी रुग्णालयातील कर्मचा-यांनी उपस्थितींचे मोबाईल घेऊन संबंधित व्हिडीओ डिलीट केले.