शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परवानगीशिवाय अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:18 IST

विद्यार्थ्यांचा आरोप; सोमैया खासगी विद्यापीठात हेच अभ्यासक्रम दुप्पट शुल्क घेऊन केले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडे अभ्यासक्रम बंद करण्याची प्रक्रिया चालू असताना, पूर्ण परवानग्या नसताना सोमैया महाविद्यालयाकडून स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातल्याचा ओराप मनविसेसह विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.

मुंबई विद्यापीठाला संलग्नित सोमैय्या विद्याविहार महाविद्यालयात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना तेथील अभ्यासक्रम अचानक बंद करण्यात आले. त्याऐवजी नव्यानेच मान्यता मिळालेल्या सोमैय्या खासगी विद्यापीठात हे अभ्यासक्रम दुप्पट शुल्क घेऊन सुरू करण्यात आले आहेत. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, प्रक्रिया पार न पाडता नियमित महाविद्यालयांतील अभ्यासक्रम बंद करणाºया या महाविद्यालयाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

२० ते ३० हजारांत प्रवेश होणाºया अभ्यासक्रमासाठी ७० हजार ते १ लाखापर्यंत शुल्क मोजण्याचा पर्याय दिला जात आहे. अल्पसंख्याक, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी हे असंवैधानिक असल्याचे मत मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी व्यक्त केले. दरम्यान, सोमैयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.स्थानिक समितीकडून पुढील कार्यवाहीविद्यापीठाकडे सोमैय्या महाविद्यालयाकडून काही अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव आला आहे. मात्र विद्यापीठाकडून पुढील कार्यवाही किंवा ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत. या महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी पाहता ते तात्काळ बंद करता येणार नाहीत. विद्यापीठाच्या स्थानिक समितीकडून पुढील कार्यवाही होईल. या दरम्यान महाविद्यालयाकडून अभ्यासक्रम बंद केल्यास योग्य ती कारवाई होईल.- दीपक वसावे, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्कहिरावून घेण्याचा प्रयत्नसोमैय्या महाविद्यालयांत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे मध्यम वर्गापासून ते दुर्बल घटकांपर्यंत आहेत. कमी शुल्कातील अभ्यासक्रम बंद करून त्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. अभ्यासक्रम पुन्हा सुरू न केल्यास सोमैया खासगी विद्यापीठ बंद करण्याची मागणी आम्ही राज्य व केंद्राकडे करू.- संतोष गांगुर्डे, राज्य उपाध्यक्ष, मनविसे 

टॅग्स :Educationशिक्षण