ऊसतोड कामगारांसाठी ‘घरकूल’ - मुंडे
By Admin | Updated: October 20, 2015 01:32 IST2015-10-20T01:32:18+5:302015-10-20T01:32:18+5:30
ऊसतोड कामगारांसाठी सरकारने नेमलेल्या लवादावर माझी नेमणूक झाल्याने मंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. कामगारांच्या महामंडळाच्या

ऊसतोड कामगारांसाठी ‘घरकूल’ - मुंडे
पाथर्डी (अहमदनगर) : ऊसतोड कामगारांसाठी सरकारने नेमलेल्या लवादावर माझी नेमणूक झाल्याने मंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. कामगारांच्या महामंडळाच्या माध्यमातून घरकूल योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे
दिली़
पाथर्डी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या म्हणाल्या, ऊसतोडणीसाठी कामगार रक्ताचे पाणी करतात. त्यांच्या जिवावर कारखानदारी चालते़ त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ झालीच पाहिजे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कामगारांचे आंदोलन व संप लोकशाही मार्गाने सुरू असल्याने त्यांच्यावर गुन्हे न नोंदविण्याची सूचना गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना केली आहे. राज्य सरकार कामगारांच्या पाठीशी आहे. त्यांच्यासाठी सरकारने महामंडळ तयार केले असून, लवकरच त्यांच्यासाठी घरकूल योजना राबविण्यात येणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले़ डिसेंबरअखेर राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)