गैरव्यवहार समोर यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 00:54 IST2015-08-18T00:54:05+5:302015-08-18T00:54:05+5:30
आयपीएलच्या अहमदाबाद आणि पुणे या दोन संघांच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण समोर यायला हवे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली

गैरव्यवहार समोर यावा
पुणे : आयपीएलच्या अहमदाबाद आणि पुणे या दोन संघांच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण समोर यायला हवे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच देशात कोणत्याही वादग्रस्त घटना घडल्या की पंतप्रधान परदेशदौऱ्यावर जातात, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या निराशाजनक आणि नाकर्तेपणाचा इतिवृत्तान्त सांगणाऱ्या ‘फसवणुकीची वर्षपूर्ती’ या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. बीसीसीआयचे शशांक मनोहर यांनी या निविदांवर आक्षेप घेतले होते. या प्रकरणामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. अहमदाबाद संघाची निविदा रद्द करण्यात आली. त्या वेळी पंतप्रधान मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तर अमित शहा हे उपाध्यक्ष होते. त्यामुळे या प्रकरणातील कागदपत्रे समोर यायला हवीत, असे सांगून चव्हाण म्हणाले, ललित मोदी म्हणतात की मोदी माझे चांगले मित्र आहेत. अशा घटनांमुळे देशाचे हसू होत आहे. अनेक वर्षांत काँग्रेसच काय पण भाजपा सरकारचेही पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.