शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या स्वागतासाठी व्हा तयार, धाे-धाे बरसणार, उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:04 IST

तहानलेल्या महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : यंदा मान्सूनची चाल चक्रीवादळामुळे मंदावली आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होऊनही आतापर्यंत निम्म्या राज्यांमध्येही तो योग्य प्रकारे पोहोचलेला नाही. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. तहानलेल्या महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

शुक्रवारपासून कोकणात २३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० जून ते ६ जुलैदरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला असून, अनुकूल हवामानामुळे शुक्रवारपासून दक्षिण कोकणात पाऊस जोर पकडणार आहे.

या राज्यांत उष्णतेची लाटओडिशा, बिहार, झारखंड आणि तेलंगणा.

वातावरण बदलण्यास सुरुवातगेल्या २४ तासांत महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये उष्णतेची लाट होती. मात्र, महाराष्ट्रासह मध्य भारतातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. 

आसाममध्ये पूर : पावसामुळे आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला उधाण आले आहे. आसाम राज्य आपत्ती दलानुसार राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरामुळे परिस्थिती वाईट आहे.  १०८ गावांतील १ लाख २० हजार लोक बाधित झाले आहेत. नलबारी जिल्ह्यात सर्वाधिक ४५ हजार लोक पुराने बाधित झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र