केंद्रातील काटकसरीला राज्यात मिळाला खो!

By Admin | Updated: November 1, 2014 00:24 IST2014-11-01T00:24:43+5:302014-11-01T00:24:43+5:30

केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारी खर्चात काटकसर करण्याचा निर्णय घेतला

Get lost in a thundering state of the center! | केंद्रातील काटकसरीला राज्यात मिळाला खो!

केंद्रातील काटकसरीला राज्यात मिळाला खो!

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारी खर्चात काटकसर करण्याचा निर्णय घेतला असला तरी मंत्रलयात तातडीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी अन्य सनदी अधिका:यांप्रमाणो आता जिल्हा पोलीस प्रमुखांनाही शासकीय खर्चाने विमानाने प्रवास करता येईल.
दोन वर्षापूर्वी आघाडी सरकारने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना मुंबईतील बैठकांना वेळेत उपस्थित राहता यावे म्हणून विमान प्रवासाची मुभा दिली होती. राज्यातील कोणत्याही भागातून या अधिका:यांना शासकीय खर्चाने विमानाने मुंबई गाठता येत असली तरी, अशाच प्रकारच्या बैठकांना जिल्हा पोलीस प्रमुखांना मात्र मिळेल त्या मार्गाने म्हणजेच रेल्वे किंवा सरकारी वाहनाने मुंबई गाठावी लागे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनाही विमान प्रवासाची अनुमती मिळण्याचा प्रस्ताव गृह खात्याने सामान्य प्रशासन विभागाला पाठविला होता. परंतु त्यावर आघाडी सरकारच्या काळात निर्णय होऊ शकला नाही. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश जारी केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Get lost in a thundering state of the center!