लष्करात नोकरी मिळवण्यासाठी बनवाबनवी, चार परप्रांतिय तरुण गजाआड
By Admin | Updated: July 7, 2016 15:40 IST2016-07-07T15:40:52+5:302016-07-07T15:40:52+5:30
लष्करात नोकरी मिळवण्याकरीता चार प्ररप्रांतिय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे

लष्करात नोकरी मिळवण्यासाठी बनवाबनवी, चार परप्रांतिय तरुण गजाआड
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 07 - लष्करात नोकरी मिळवण्याकरीता चार प्ररप्रांतिय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशादरम्यान त्या तरुणांनी सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने कामठी गार्ड रेजिमेंटल सेंटरच्या वतिने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
राजसिंग ओमप्रकाश चव्हाण (२१, रा. निमजलाय मंदन, जि. अल्वर), राहूलकुमार भार्गव सुनिल दत्त शर्मा (२०, रा. पणवी- पाणीपोल, जि. जयपूर), हॅप्पीकुमार शंभाभू दयाल (जि. सिरसा हरियाणा), आणि रोहितकुमार रामकिसन (२०, रा. कुरीयास, महेंद्रगड, हरीयाणा) अशी आरोपींची नावे आहेत.
जून महिन्यात गार्ड रेजिमेंटल आर्मी कामठीत शिपाई पदाची भरती करण्यात आली. त्याच्या प्रशिक्षणासाठी उपरोक्त आरोपींनी बनावट रहिवासी प्रमाणपत्र सादर केले आणि प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवला. त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गार्ड रेजिमेंटल सेंटर जयदिपसिंग हरचरणसिंग घुमण (वय ४२) यांनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध केली. बुधवारी रात्री चारही आरोपींना अटक करण्यात यश आल्याची माहिती ठाणेदार जयेश भंडारकर यांनी दिली. आरोपींची चौकशी सुरू आहे.