प्रत्येक मराठी चित्रपटास अनुदान मिळावे

By Admin | Updated: May 30, 2016 03:55 IST2016-05-30T03:55:38+5:302016-05-30T03:55:38+5:30

राज्य शासनाकडून ‘अ’ विभागातील मराठी चित्रपटांना ४० लाखांचे, ‘ब’ विभागातील चित्रपटांसाठी ३० लाखांचे तर ‘क’ विभागातील चित्रपट अनुदान योजनेतून बाद केले जातात.

Get grant for every Marathi film | प्रत्येक मराठी चित्रपटास अनुदान मिळावे

प्रत्येक मराठी चित्रपटास अनुदान मिळावे


पुणे : राज्य शासनाकडून ‘अ’ विभागातील मराठी चित्रपटांना ४० लाखांचे, ‘ब’ विभागातील चित्रपटांसाठी ३० लाखांचे तर ‘क’ विभागातील चित्रपट अनुदान योजनेतून बाद केले जातात. यंदा ८० चित्रपटांपैकी ४८ चित्रपट बाद करण्यात आले आहेत. चित्रपटासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन राज्य शासनाने प्रत्येक मराठी चित्रपटास किमान १० लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
महामंडळाच्या आगामी काळातील उपक्रमाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, की साहित्य आणि नाट्यसंमेलनाच्या धर्तीवर जूनअखेर पुण्यामध्ये पहिले अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन घेण्याचा मानस आहे. राज्य शासनाकडून निधी मिळावा, यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त ३ जून रोजी कोल्हापूर येथे एका समारंभाचे आयोजन केले आहे. पुण्यामध्ये १८ जून रोजी स्नेहमेळावा आयोजित केला असून, जुलैअखेर पुण्यातच निर्मात्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये चित्रभूषण व चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. वर्षभरात चित्रपट महामंडळाचे पूर्णपणे डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Get grant for every Marathi film