‘जर्मनी भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रेडिंग पार्टनर : सीबर्ट
By Admin | Updated: November 13, 2014 00:01 IST2014-11-12T23:13:50+5:302014-11-13T00:01:03+5:30
आम्हाला अशा पद्धतीने कोल्हापूरची होणारी मदत अभिमानास्पद आहे.

‘जर्मनी भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रेडिंग पार्टनर : सीबर्ट
कोल्हापूर : जर्मन कंपन्यांच्या वाहनांसाठीचे डिस्क ब्रेक व अन्य सुटे भाग हे कोल्हापुरातून पुरविले जातात. आम्हाला अशा पद्धतीने कोल्हापूरची होणारी मदत अभिमानास्पद आहे. सध्या जर्मनी भारताचा पहिल्या क्रमांकाचा ‘ट्रेडिंग पार्टनर’ असून व्यापार-उद्योगासह शिक्षण व पर्यटनक्षेत्रात या दोन देशांना परस्पर सहकार्य वाढविण्याची संधी आहे, असे मत फेडरल रिपब्लिक आॅफ जर्मनीचे कौन्सुल जनरल मायकेल सीबर्ट यांनी आज, बुधवारी येथे केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य’ या जर्मन अनुवादित चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. सीबर्ट म्हणाले, पुण्यात सुमारे तीनशे जर्मन कंपन्या कार्यरत आहेत, तर कित्येक जर्मन कंपन्यांच्या वाहनांसाठीचे डिस्क ब्रेक व अन्य सुटे भाग हे कोल्हापुरातून पुरविले जातात, ही अभिमानाची बाब आहे.