खंडणी उकळणारा वकील गजाआड
By Admin | Updated: October 23, 2015 03:03 IST2015-10-23T03:03:53+5:302015-10-23T03:03:53+5:30
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दावे व खटले मागे घेण्यासाठी, तसेच योजनेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी बांधकाम

खंडणी उकळणारा वकील गजाआड
पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेले दावे व खटले मागे घेण्यासाठी, तसेच योजनेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या वकिलाला पोलिसांनी गजाआड केले आहे. हे पैसे घेतल्यानंतर हा वकील व त्याच्या सासऱ्याने खटले मागे घेण्यासाठी आणखी ९५ लाख रुपये मागितल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वकिलाच्या सासऱ्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
अॅड. प्रसाद कुलकर्णी या वकिलाला अटक करण्यात आली असून, सासरे डॉ. अरुण निरंतर (रा. कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल चंद्रकांत केले (४५, शिवाजीनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कुलकर्णी याला गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात असता, न्यायालयाने २६ आॅक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली.
फिर्यादी विशाल केले यांचे औंध परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत काम सुरू आहे. कुलकर्णी याने त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या न्यायालयात दावे, खटले दाखल केले आहेत. हे दावे मागे घेण्यासाठी सुरुवातीला ६५ लाखांची मागणी केली. त्यापैकी ५० लाख रुपये देण्यात आले. मात्र, कुलकर्णीने आणखी ९५ लाख रुपयांची मागणी केली. (प्रतिनिधी)