शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:37 IST

Gautami Patil Reaction On Maratha Reservation: राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर गौतमी पाटीलने सूचक उत्तर दिले.

Gautami Patil Reaction On Maratha Reservation:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसीमधून आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असून, याला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आहे. यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ आमनेसामने आले आहेत. यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मलाही कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली आहे. गौतमी पाटीलने केलेले विधान चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. 

गौतमी पाटील हिची अद्यापही राज्यभरात क्रेझ कायम आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांत राडेही होत असतात. मात्र, निमित्त कोणतेही असो, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठी डिमांड असल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी गौतमी पाटीलला प्रश्न विचारला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे, आज अनेकांना आरक्षण हवे आहे. तर ते मिळाले पाहिजे. मला देखील आरक्षण हवे आहे. मलाही कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, असे सांगत, कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवे. सध्या सगळे नीट सुरू आहे, असे गौतमी पाटीलने म्हटले आहे. गौतमी पाटील राजकारणात एन्ट्री करणार का, असा प्रश्न  विचारण्यात आला. यावर, मी अजिबात राजकारणात जाणार नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले.

दरम्यान, गौतमी पाटीलसोबतच आता हिंदवी पाटीलची लोकप्रियता वाढत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचे चांगले होवो. आमच्यातून कोण फुटून गेले तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचे चांगले होऊ दे, असे आम्ही म्हणतो, असे गौतमी पाटीलने सांगितले. 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण