गौताळ््यात दरोडेखोरांचा हैदोस
By Admin | Updated: August 20, 2015 00:33 IST2015-08-20T00:33:39+5:302015-08-20T00:33:39+5:30
सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी रात्री गौताळा अभयारण्यात फिल्मी स्टाईल हैदोस घातला. जंगलातील दोन मोठी झाडे कन्नड - पिशोर रस्त्यावर टाकून

गौताळ््यात दरोडेखोरांचा हैदोस
कन्नड (जि. औरंगाबाद) : सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने मंगळवारी रात्री गौताळा अभयारण्यात फिल्मी स्टाईल हैदोस घातला. जंगलातील दोन मोठी झाडे कन्नड - पिशोर रस्त्यावर टाकून त्यांनी सहा वाहने लुटली. त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही त्यांनी हल्ला केला.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका पोलिसासह पाच जण जखमी झाले. पोलिसांचा आणखी फौजफाटा येत असल्याची चाहूल लागताच ही टोळी पसार झाली. कन्नड-पिशोर-सिल्लोड रस्ता अभयारण्यातून जातो. कन्नडकडून पिशोरकडे जाताना चंदन नाल्याजवळील वळणावर लुटीचा प्रकार घडला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी वळण रस्त्यावर दोन झाडे तोडून टाकली. आधी त्यांनी ट्रकवर दगडफेक केली. चालकाला मारहाण करून ऐवज लुटला. पाठोपाठ मेटॅडोर, ट्रक, जीप व कारही दरोडेखोरांनी अडविली. जीपमधील महिलांना बेदम मारहाण करीत त्यांचे दागिने लुटले. इतर वाहनांतील पुरुषांनाही बेदम मारहाण केली.
दरोडेखोरांचा हैदोस सुरू असतानाच हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जात असताना दूरवरुनच चालक संतोष बोडखे यांना रुग्णवाहिकेच्या प्रकाशझोतात रस्ता अडवून लुटालूट सुरू असल्याचे दिसले. त्यांनी गाडीचे लाईट बंद करून वाहन मागे वळविले. रुग्णवाहिकेला पाहताच दरोडेखोरांनी तिच्या दिशेने दगडफेक केली. त्यात रुग्णवाहिकेची काच फुटली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून तेथून वाहनासह पळ काढला आणि कन्नड पोलीस ठाण्यात माहिती दिली.
त्यानंतर गस्ती पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांचे पथक तेथे आले. त्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर जीप उभी केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केल्यानंतर त्यांनी कन्नड पोलीस ठाण्यातून अधिक
कुमत मागविताच दरोडेखोर पसार झाले. (प्रतिनिधी)