गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:56 IST2018-08-21T02:48:40+5:302018-08-21T06:56:57+5:30
अमोल काळेचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध?

गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन!
पिंपरी : कर्नाटकात प्राध्यापकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चिंचवडच्या अमोल अरविंद काळे यास दावणगिरी येथून एसआयटीने ताब्यात घेतले. त्या वेळी बंगळुरूच्या पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात त्याचा संबंध असल्याचे धागेदोरे हाती लागले होते. एका प्राध्यापकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दावणगिरी येथे २१ मे रोजी काळेला अटक केली होती.
कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक चिंचवडला येऊन गेले. त्याच्या डायरीतील नोंदीत पत्रकार गौरी लंकेश यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असल्याची चर्चा होती. ३१ मे रोजी आरोपी काळे याला गौरी लंकेश हत्येसंबंधीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून वर्ग केले गेले.