गौराई माझी सजली ग...

By Admin | Updated: September 10, 2016 01:53 IST2016-09-10T01:53:16+5:302016-09-10T01:53:16+5:30

गौरीचे आगमन झाले असून तिची पूजा, तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचे नैवेद्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात तिचे स्वागत

Gaurai my tears | गौराई माझी सजली ग...

गौराई माझी सजली ग...

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- शहरात घरोघरी गौरीचे आगमन झाले असून तिची पूजा, तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचे नैवेद्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात तिचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी गौरीच्या महानैवेद्याचा दिवस असल्याने घराघरांत गोडाधोडाचे पदार्थ, सोळा भाज्यांचे नैवेद्य दाखविण्यात आले. यंदा गौराईचे आगमन पूर्वा नक्षत्रावर झाल्याने गौरीचे ओवसे (ववसे) केले जातात. फराळाचे पदार्थ, विड्याची पानं, सुपारी, नारळ सुपात घेऊन नवी नवरी ते वाण घरोघरी घेऊन जात होत्या.
शुक्रवारी घरोघरी गौरींचे पूजन केले गेले. गौरीला आल्यापाल्याची भाजी, भाकरी, दहीभात व अळूच्या वडीचा नैवेद्य दाखवण्यात आला. महिलांनी एकत्र जमून गौरी गीतांनी रात्र जागवली. तर तरुणींनी झिम्मा-फुगडीच्या खेळाचा आनंद लुटला. अनेक ठिकणी नव्या नवरीचे ओवसे (ववसे) केले जात असून. फराळाचे पदार्थ, विड्याची पानं, सुपारी, नारळ सुपात घेऊन नवी नवरी आसपासच्या घरांत वाण घेऊन जाताना दिसून आल्या.
गौराईच्या दागिन्यांमध्येही पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम दिसून आला. कंबरपट्टे, बाजूबंद, अंगठी, मंगळसूत्र, पुतळ्याची माळ, ठुशी, पाटल्या, बुगड्या अशा पारंपरिक दागिन्यांबरोबरच खड्या-मोत्यांचे आधुनिक दागिने पाहायला मिळाले.

Web Title: Gaurai my tears