शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गौराई माझी लाडाची लाडाची गं, मुस्लीम कुटुंबात ४० वर्षांपासून सुखाने नांदते गौराई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:23 IST

सातेफळ (ता. जामखेड) येथील सय्यद कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून गौराईची स्थापना करते.

संतोष थोरातलोकमत न्यूज नेटवर्कखर्डा (जि. अहिल्यानगर) : सातेफळ (ता. जामखेड) येथील सय्यद कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून गौराईची स्थापना करते. मुस्लीम कुटुंब असूनही हिंदूंचा हा सण ते  मागील ४० वर्षांपासून मोठ्या उत्साहात अन् मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचे हे कुटुंब एक आदर्श उदाहरण ठरले आहे. १९७२ च्या दुष्काळात रशीद दगडू सय्यद यांचे वडील दगडू नन्हू सय्यद हे उदरनिर्वाहासाठी मूळ गाव मलकापूर (ता. परंडा) सोडून सातेफळ येथे आले. 

गावातील महिला दर्शनासाठी घरी : तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ते गौरी-गणपतीसमोर सुंदर रांगोळी काढतात. मूर्तींची पूजा करतात. आकर्षक सजावट करतात. त्यासाठी विद्युत रोषणाई, विविध फराळ आणि खेळण्यांची सुंदर मांडणी केली जाते. 

शेतात सापडल्या मूर्तीशेतात काम करताना त्यांना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या. सलग चार दिवस या मूर्ती शेतातच होत्या. नंतर त्यांनी या मूर्ती घरी आणल्या खऱ्या, पण त्यांचे पुढे काय करायचे, हा प्रश्न कुटुंबाला पडला. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गावातील मंदिराचे पुजारी, मौलाना आणि ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला व गौरीपूजन करून मूर्ती स्थापना केली. तेव्हापासून सय्यद कुटुंबाने ही परंपरा सुरू केली. सय्यद कुटुंबाची ही गौराई पाहण्यासाठी, तसेच सातेफळसह परिसरातील महिला हळदी-कुंकवासाठी आवर्जून घरी येतात.

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीAhilyanagarअहिल्यानगरMaharashtraमहाराष्ट्र