‘ऐंशी’तही सुरू आहे ‘गौराबार्इं’ची चळवळ !

By Admin | Updated: December 29, 2014 00:22 IST2014-12-29T00:16:51+5:302014-12-29T00:22:24+5:30

पहिल्या देवदासी कार्यकर्त्या : २०० जणींना केले जटामुक्त

Gaurabaiin's movement in 'Eshi' is going on! | ‘ऐंशी’तही सुरू आहे ‘गौराबार्इं’ची चळवळ !

‘ऐंशी’तही सुरू आहे ‘गौराबार्इं’ची चळवळ !

राम मगदूम - गडहिंग्लज -आता शरीर थकलं आहे, पण मन स्वस्थ बसू देत नाही. जट वाढलेली बाया-माणसं, मुलं-मुली दिसल्या की, ‘ती’ अस्वस्थ होते, तास्नतास् त्यांचं ‘बे्रनवॉश’ करते. मनपरिवर्तनाने त्यांची सहमती मिळवते आणि जटामुक्त करून त्यांना ‘माणसा’त आणते. वयाच्या ऐंशीकडे झुकल्यानंतरही गौराबार्इंची लोकप्रबोधनाची ही चळवळ अखंडितपणे सुरू आहे.
महाराष्ट्र घडविणाऱ्या महिलांपैकी ‘महाराष्ट्र कन्या’ म्हणून महाराष्ट्र फौंडेशनतर्फे त्यांचा गौरवदेखील झाला आहे. ४० वर्षांपासून देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी यांच्यासाठी झटणाऱ्या देवदासी चळवळीतील पहिल्या कार्यकर्त्या गौराबाई बाप भीमा सलवादे यांची ही कहाणी.
स्वत: अडाणी असूनही कन्या सुरेखा मुनीव यांना तिने शिक्षिका बनविले. मुनीवबार्इंची कन्या आणि गौराबार्इंची नात अर्चना हिने नुकतीच पीएच.डी. मिळविली.
१९७०च्या दशकात डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेने गडहिंग्लजसह सीमाभागात देवदासी प्रथा निर्मूलनाची चळवळ सुरू झाली. त्यातील बिनीच्या कार्यकर्त्या म्हणजे गौराबाई ह्या आहेत.
अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, प्रा. विठ्ठल बन्ने, प्रा. सुभाष जोशी, स्व. दादा पेडणेकर, बसाप्पा हुलसार, शंकर मेंडुले व भिकाजी मोहिते, बापू म्हेत्री, चंदाबाई बारामती, पुतळाबाई कांबळे, चंद्रकांत तेलवेकर, दत्ता मगदूम आदींच्या पुढाकाराने ही चळवळ वाढली व राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.
देवीला मुली सोडण्याची प्रथा बंद झाली. तुटपुंजी का असेना देवदासींना पेन्शन सुरू झाली. देवदासी प्रथाबंदीसाठी कायदादेखील झाला, पण त्याची अजून अंमलबजावणी नाही. मात्र, ‘गौराबार्इं’ची चळवळ अखंडपणे सुरू आहे. आजअखेर त्यांनी सुमारे २०० जणींना जटामुक्त केले आहे.


महाराष्ट्र फौंडेशनतर्फे गौरव
१९९७ मध्ये महाराष्ट्र फौंडेशनतर्फे ‘गौराबार्इं’चा गौरव झाला. धारवाडच्या कानडी आकाशवाणी केंद्रावरून आणि एका मराठी वृत्तवाहिनीवरून त्यांची मुलाखतदेखील प्रसारित झाली. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ संपादित ‘डॉटर्स आॅफ महाराष्ट्रा’ या गं्रथात अभिजित वर्दे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा समावेश आहे.
‘शबनम्’ही झाली जटामुक्त !
गौराबार्इंनी अलीकडेच मुस्लिम समाजातील ‘शबनम्’ नामक मुलींची जट काढली आणि आपल्या घराशेजारीच एका खोलीत राहायला जागा देऊन तिला ‘आधार’देखील दिला आहे.

Web Title: Gaurabaiin's movement in 'Eshi' is going on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.