गेट वे वर आज विश्वशांती परिषद

By Admin | Updated: May 10, 2017 02:55 IST2017-05-10T02:55:26+5:302017-05-10T02:55:26+5:30

तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उद्या बुधवारी गेट वे आॅफ इंडिया येथे

Gateway Today Vishavshanti Parishad | गेट वे वर आज विश्वशांती परिषद

गेट वे वर आज विश्वशांती परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उद्या बुधवारी गेट वे आॅफ इंडिया येथे राज्य शासनाच्या वतीने सायंकाळी ६.३० ला साजरी करण्यात येणार आहे. त्या आधी काळाघोडा ते गेट वे आॅफ इंडिया अशी विश्व शांतता रॅली काढण्यात येईल.
बुधवारी महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विश्वशांती परिषदेसाठी बहुसंख्य बौद्ध असलेल्या १७ देशांच्या राजदूतांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. शांततेचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गेहलोत विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.

Web Title: Gateway Today Vishavshanti Parishad