जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

By Admin | Updated: September 16, 2014 22:47 IST2014-09-16T22:47:41+5:302014-09-16T22:47:41+5:30

17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

Gastro victim in Jawhar | जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

हुसेन मेमन ल्ल जव्हार
विहीरीतील दूषीत पाण्यामुळे दोन दिवसांतया तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी या पाडय़ातील   एकूण 17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
नांदगांव पैकी राजेवाडी या पाडय़ातील रहिवासी या विहिरीतील दूषीत पाणी पित आहेत. या विहिरीच्या जवळच शेणाचा गोठा आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोठय़ातील शेणाचे दूषीत पाणी हे विहिरीत गेल्यामुळे विहिरीचे पाणी दुषीत झाले. त्यामुळे ते प्यायल्याने  रविवारी 4 रूग्ण, तर सोमवारी रोजी 13 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण लागली.  जंतूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे लगेचच रूग्णांना उलटी जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र रूग्णांची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे त्यांना जव्हारच्या कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी वाळू लक्ष्मण वड वय - 1क् या मुलाला तेथून आणत असतांना रस्त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजेवाडी परिसरात घबराट माजली आहे. 
तसेच वाळू लक्ष्मण वड याचे शवविच्छेदनाच्या अहवालात रेस्पीरेशन न्यूमोनिआ असल्याचे सिध्द झाल्यामुळे त्याचा मृत्यू हा गॅस्ट्रोमुळे झालेला नाही, तसेच इतर एकूण 15 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण झालेली आहे. परंतू वेळीच उपचार झाल्याने या रूग्णांची परिस्थिती बरी आहे. असे जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगीतले.  
अतिरीक्त आरोग्य अधिकारी जव्हार यांचे कडून राजेवाडी येथे मेडीकल चेक अप कॅम्प लावण्यात आला असून घरोघरी जाऊन रूग्णांची विचारपूस केली जात आहे. या करीता  आंगणवाडीमध्ये 24 तास एक मेडीकल ऑफिसर, व सव्रेक्षणासाठी 5 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लागण पसरणार नाही, व रूग्णांच्या आकडय़ात वाढ होणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी माहिती अतिरीक्त आरोग्य  अधिकारी डॉ. आर. पी. पाटील यांनी दिली.परत एकदा राजेवाडीतील आदिवासी बांधवांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावाच्या विकासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परीषद , पंचायत समिती मार्फत ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात येते, व त्यांना गावातील समस्यां जाणून आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविलेले असते. परंतु ते व्यवस्थित पार पाडले जात नाही. म्हणूनच अशा साथी पसरतात.
 

 

Web Title: Gastro victim in Jawhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.