खापरी स्पेशलमधून पेट्रोलगळती
By Admin | Updated: February 2, 2015 04:36 IST2015-02-02T04:36:34+5:302015-02-02T04:36:34+5:30
वर्धा स्थानकावर खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती होत असल्याचे शनिवारी रात्री उघडकीस आले़ एका प्रवाशाने ही बाब रेल्वे प्रशासन आणि रेल्वे

खापरी स्पेशलमधून पेट्रोलगळती
वर्धा : वर्धा स्थानकावर खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती होत असल्याचे शनिवारी रात्री उघडकीस आले़ एका प्रवाशाने ही बाब रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही याकडे कानाडोळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे़
वर्धा स्थानकावर पानेवाडी ते खापरी डेपो ही ५० वॅगन असलेली पेट्रोल भरलेली खापरी स्पेशल शनिवारी मध्यरात्रीनंतर १ पासून उभी होती. खापरी डेपोमध्ये जागा उपलब्ध नसल्याने ही गाडी वर्धेतच थांबविण्यात आली़ या मालगाडीच्या चार वॅगनमधून पेट्रोलची गळती सुरू होती. ही बाब जागरुक प्रवाशाने स्टेशन प्रबंधक आणि रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली़ रेल्वे पोलिसांनी वरपांगी पाहणी करीत ही गळती सामान्य असल्याचा अहवाल दिला; पण ती रोखण्यासाठी प्रयत्न केले नाही़ या खापरी स्पेशलच्या चार वॅगनमधून दुपारी ४.३० वाजेपर्यंत पेट्रोलची गळती सुरूच होती. या मालगाडीतील काही वॅगनला सील लावण्यात आलेले होते तर काही वॅगनला सीलही नव्हते. शिवाय सील असलेल्या व नसलेल्या वॅगनमधूनही पेट्रोलची गळती सुरू होती. (प्रतिनिधी)