शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

बुकिंग करताना बुडू शकते गॅस सबसिडी

By admin | Updated: July 20, 2015 00:04 IST

सावधान : ग्रामीण भागातून अनेक तक्रारी दाखल

प्रवीण देसाई -कोल्हापूर -गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. ते निवडताना चुकून आकड्यांची अदलाबदल झाल्यास सबसिडी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. ही तांत्रिक चूक झाल्यास त्याचे पुढील निराकरण कसे करायचे, याचे उत्तर गॅस वितरकांकडेही नाही. सध्या ही योजना इंडेन कंपनीकडून सुरू झाली असली तरी ‘एचपीसी’ व ‘बीपीसी’ कंपन्यांकडेही ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सबसिडीच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास दहा तक्रारी ग्राहक पंचायत संघटनेकडे आल्या आहेत.गेल्या वर्षभरापासून मोबाईलवरून गॅस बुकिंगची नोंदणीहोत आहे. गॅस कंपनीच्या दिलेल्या क्रमांकावर ग्राहकांनी आपल्या विक्रेत्याकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्याद्वारे कॉल केल्यास गॅस बुकिंग होतो. ग्राहकांना घरबसल्या ही सुविधा कंपन्यांनी जरी उपलब्ध करून दिली असली तरी ती सध्या मोठी डोकेदुखी झाल्याचे दिसते. कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मोबाईलवरून गॅस बुक करताना गॅसची सबसिडी नको असेल तर ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ बटण दाबण्याची सूचना येते. त्यामध्ये चुकून ‘शून्य’ बटण दाबल्यास सर्वसामान्यांना मिळणारी सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शाहूवाडी व चंदगड तालुक्यातील इंडेन गॅस कंपनीच्या ग्राहकांना बसला आहे. सबसिडी बुडण्याच्या भीतीने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्य:स्थितीला विशेषत: ग्रामीण भागात या अडचणी जाणवत आहेत. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहक सुशिक्षित असतील असेही नाही. त्यामुळे चुकून ‘शून्य’ बटण दाबले गेल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप होत आहे.याबाबत पुढे काय करायची यासंबंधीची विचारणा करायला गेल्यावर गॅस विक्रेत्यांजवळही त्याचे उत्तर नाही. कारण ही तांत्रिक सुधारणा थेट कंपनीकडूनच झाली असल्याने विक्रेत्यांनाही त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही.मोबाईलवरून गॅस बुकिंगसाठी सुरू केलेली पद्धत योग्यच आहे परंतु ग्रामीण भागातील लोकांना याबाबत अडचणी येत आहेत त्यामध्ये कंपन्यांनी ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.-अरुण यादव, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायतमोबाईलने बुकिंग करताना घ्या काळजीयासंदर्भात ग्राहकांच्या हितासाठी लढणाऱ्या ग्राहक पंचायत या संघटनेकडे जिल्ह्यातून जवळपास दहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सात व चंदगडमधील तीन तक्रारींचा समावेश आहे. एखादी नवीन योजना आणताना कंपनीने सुरुवातीला आपल्या गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहकांनाही या संदर्भात सविस्तर माहिती दिली पाहिजे तसेच या योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊन ग्राहकांमध्ये रूळत नाहीत तोपर्यंत जुन्या पद्धती बंद करणे योग्य नसल्याचा ग्राहकांचा सूर आहे.