शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅसचा तुटवडा, विधानभवनही सुरक्षित नाही तर…”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:47 IST

Congress Harshwardhan Sapkal: सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress Harshwardhan Sapkal: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना महायुद्धाला सामोरे जावे लागले, स्वातंत्र्यानंतरही जगाच्या अनेक भागात अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले, पण त्यावेळी काँग्रेस सरकारने, तत्कालीन पंतप्रधान यांनी राष्ट्र म्हणून सर्वांशी संवाद साधत ठोस धोरण, योग्य नियोजन यामुळे गॅस वा इंधनाच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. पण भाजपा सरकारकडे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतेही धोरण नाही, संवाद नाही, सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे

माझ्यावर फडणवीस व भाजपाचे नेते अत्यंत खालच्या पातळीवरची टिका करतात त्याचे आश्चर्य वाटत नाही. कारण फडणवीस व भाजपा विचार हा बहुजनांचे हक्क नाकारणारा आहे. हजारो वर्षापासूनचा हा संघर्ष आहे, त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे. याच विचाराचा सामना आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही करावा लागला, मी तर पामर आहे. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून मी फडणवीस यांच्यासाठी परमेश्वराकडे सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन ओळी सांगतो की, छोटे दिल से कोई बडा नही होता, तुटे दिल से कोई खडा नही होता. विधान भवनात बॉम्ब असल्याचा ई मेल आला हे ऐकून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याचा प्रत्यय येतो. विधान भवन जर सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत पोलीस सध्या खलाचे रक्षण करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.   

दरम्यान, सरकारने अचानक गॅसच्या किमती वाढवल्या व दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडर