विरार येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ३ जण मृत्युमुखी

By Admin | Updated: May 9, 2014 22:31 IST2014-05-09T21:13:35+5:302014-05-09T22:31:25+5:30

आज शुक्रवारी सकाळी विरार पश्चिमेस एका इमारतीमधील सदनिकेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघे जण मृत्युमुखी पडले.

Gas Cylinder blast in Virar; 3 people died | विरार येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ३ जण मृत्युमुखी

विरार येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ३ जण मृत्युमुखी

वसई : आज शुक्रवारी सकाळी विरार पश्चिमेस एका इमारतीमधील सदनिकेत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघे जण मृत्युमुखी पडले. ही घटना सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
विरार पश्चिमेस दळवी हॉस्पिटलनजीक असलेल्या मनिष को. ऑप. हा. सोसायटीमध्ये राहणार्‍या शैलेश ढेकणे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली. अल्पावधीत ही आग पसरली. या स्फोटात शैलेश ढेकणे (३९), पत्नी प्रतिभा ढेकणे (३७) व मुलगा लाभेश ढेकणे (९) या तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. सिलेंडरच्या स्फोटामागची कारणे पोलीस शोधत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Gas Cylinder blast in Virar; 3 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.