सोलापूरातील शेळगी परिसरात गॅसचा स्फोट
By Admin | Updated: May 31, 2016 20:12 IST2016-05-31T19:24:36+5:302016-05-31T20:12:00+5:30
येथील मित्रनगर शेळगी परिसरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात चार घरे भस्मसात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी आग विझविण्यासाठी

सोलापूरातील शेळगी परिसरात गॅसचा स्फोट
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 31 - येथील मित्रनगर शेळगी परिसरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात 15 घरे भस्मसात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
शेळगी परिसरात गॅसचा स्फोट झाल्यानंतर येथील वास्तव्यास असलेल्या लोकांनी आपल्या घरातील सिलिंडर बाहेर आणून ठेवले आहेत. तसेच, या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ज्या घरामध्ये स्फोट झाला त्या घरात रिक्षात गॅस भरण्याचा व्यवसाय सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. तसेच, घटनास्थळी पालकमंत्री विजय कुमार देशमुख, महापौर सुशीला आबुटे, मनपा आयुक्त विजय कुमार काळम - पाटील उपस्थित आहेत.