शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

शेअर बाजारासारखी लसणाचीही घसरगुंडी! ४०० वरून १०० वर; लाल मिरची ४० टक्क्यांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 05:15 IST

राज्यातील ३०६ बाजार समित्यांच्या आवारातील बाजारात सध्या रोज ८ ते १० हजार टन लसणाची आवक सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लसणाचा दर मागील दोन महिन्यांत ४०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. मात्र, आता आवक वाढल्यामुळे आता दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

राज्यातील ३०६ बाजार समित्यांच्या आवारातील बाजारात सध्या रोज ८ ते १० हजार टन लसणाची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात सध्या लसणाला प्रतवारीनुसार, प्रति क्विंटल ४,००० ते ९,००० रुपये असा दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री प्रतवारीनुसार, ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.

देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जाते. सध्या बहुतांश लसणाची आवक मध्यप्रदेशातून होत आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून दर कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दर मिळत आहे.

पुणे : नवीन हंगामातील मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यात शीतगृहात साठा शिल्लक असल्यामुळे यंदा लाल मिरचीचे दर उतरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भाव ४० टक्क्यांनी कमी झाले.  लाल मिरचीचा हंगाम दरवर्षी १५ जानेवारीनंतर सुरू होतो,  एप्रिलअखेरपर्यंत संपतो.  बाजारात एकूण आवकच्या ५ ते १० टक्के मिरची राज्यातून येते. मात्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथून मार्केट यार्डात दररोज ६० ते ७० टन आवक होत आहे. राजेश पोपटाणी, कांदा-बटाटा-लसूण व्यापारी, सांगली.

‘लवंगी’ घ्या की ‘काश्मिरी’ असे आहेत मिरचीचे दर !

प्रकार    २०२४    २०२५काश्मिरी ढब्बी    ४००-६५०    २८०-४०० ब्याडगी    २५०-३००    १५०-२०० तेजा (लवंगी)    १६०-२४०    १४०-१७० गुंटूर    २००-२२०    १३०-१६० खुडवा गुंटूर    ८०-११५    ५०-७० खुडवा ब्याडगी    ९०-११०    ४०-९०

टॅग्स :Farmerशेतकरी