कऱ्हाडात तडीपार गुंडाचा खून

By Admin | Updated: February 13, 2017 03:28 IST2017-02-13T03:28:50+5:302017-02-13T03:28:50+5:30

फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने वार करीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून करण्यात आला. कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार

Garg's blood in Karhad | कऱ्हाडात तडीपार गुंडाचा खून

कऱ्हाडात तडीपार गुंडाचा खून

कऱ्हाड (जि.सातारा) : फ्लॅटमध्ये घुसून धारदार शस्त्राने वार करीत तडीपार गुंडाचा निर्घृण खून करण्यात आला. कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत शनिवारी दुपारी हे हत्याकांड घडले. अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) असे खून झालेल्याचे नाव असून त्यांच्यावर मारामारी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पवार हा पत्नीसह कऱ्हाडला वास्तव्यास आला होता. त्याने भाडेतत्त्वावर घेतला. संबंधित फ्लॅट जितेश उत्तम पालेकर यांच्या मालकीचा आहे. फ्लॅट भाडेतत्त्वावर देताना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पालेकर यांनी अभिजितकडे आधारकार्ड मागितले होते. मात्र, त्यावेळी त्याने ते दिले नाही. शनिवारी सकाळी पालेकर यांनी इमारतीचे सुरक्षारक्षक रमेश पेटकर यांना अभिजितकडून आधारकार्ड आणण्यास सांगितले. पेटकर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेले. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता अभिजित रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. (प्रतिनिधी)

Web Title: Garg's blood in Karhad