राणीच्या बागेत हलला पाळणा, पाणघोडा दाम्पत्याला पुत्ररत्न
By Admin | Updated: August 20, 2016 20:32 IST2016-08-20T20:14:46+5:302016-08-20T20:32:19+5:30
भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत पाणघोडय़ाच्या एका दाम्पत्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला

राणीच्या बागेत हलला पाळणा, पाणघोडा दाम्पत्याला पुत्ररत्न
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत पेंग्विनचे आगमन शुभशकून ठरले आह़े या प्राणीसंग्रहालयात प्राणी कमी होत असल्याच्या तक्रारीच अधिक होत असताना नुकताच पाळणा हलला आह़े पाणघोडय़ाच्या एका दाम्पत्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आह़े त्यामुळे या नवीन बाळाचे कोडकौतुक करण्याची लगबग प्राणीसंग्रहालयात सुरु आह़े
बच्चेकंपनींचे खास आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे नुतनीकरण होणार आह़े दीडशे कोटी खर्च करुन या प्राणीसंग्रहालयास आंतरराष्ट्रीय लूक देण्यात येणार आह़े संथगतीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला काही दिवसांपूर्वी गती मिळाली़ गेली आठ वर्षे प्रतीक्षेत असलेले पेंग्विनचे आगमन अखेर मुंबईत झाल़े
त्यानंतर पुन्हा एकदा राणीच्या बागेत खुशखबर आह़े देवा आणि शिल्प या पाणघोडा दाम्पत्याला दुसरे अपत्य झाले आह़े गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास राणीच्या बागेतच ही प्रसुती सुखरुप पार पडली़ याआधी शिल्पाने सहा वर्षापूर्वी पाणी घोडीला जन्म दिला होता़ नुकतेच जन्मलेल्या पाणघोडय़ाचे वजन अंदाजे 25 ते 3क् किलो असल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख अधिकारी डॉ़ संजय त्रिपाठी यांनी दिली़ प्रतिनिधी
असा होणार राणीबागेचा कायापालट
थायलंडस्थित एचकेएस डिझाइनर अॅण्ड कन्सल्टंट इंटरनॅशनल कंपनीमार्फत राणीच्या बागेचे नुतनीकरण केले जात आह़े यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत़ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या प्राणीसंग्रहालयात अफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियातून प्राणी आणण्यात येणार आहेत़ परदेशातील प्राणीसंग्रहालयांप्रमाणो वनात मुक्त असलेल्या प्राण्यांना पिंज:यातून बघता येणार आह़े मात्र 2क्11 पासून हा प्रस्ताव सेंट्रल झू ऑथोरिटीच्या कात्रीत विविध परवानगीसाठी अडकला आह़े
प्राणीसंग्रहालयात आज एवढे प्राणी
52 एकरवर असलेली राणीची बाग 1862 मध्ये उभी राहिली़ या बागेमध्ये 16 जातींचे एकूण 140 सस्तन प्राणी, 30 जातींचे 294 पक्षी व सहा जातींचे 32 सरपटणारे व जलचर प्राणी असे एकूण 466 प्राणी अस्तित्वात आहेत़
* राणीच्या बागेत प्रवेशासाठी मुलांना दोन रुपये व प्रौढांकडून पाच रुपये शुल्क घेण्यात येत़े परदेशी पर्यटकांना दहा रुपये आकारण्यात येतात़
* 2013-2014 या वर्षभरात एकूण 12 लाख 26 हजार 676 नागरिकांनी राणीबागेला भेट दिली़ यामध्ये एक लाख 84 हजार 729 मुले व दहा लाख 41 हजार 947 प्रौढ होती़ यातून केवळ 66 लाख 14 हजार उत्पन्न जमा झाल़े