नाशिक जिल्हा न्यायालयात आरोपीला चपलेतून गांजा
By Admin | Updated: June 15, 2016 14:54 IST2016-06-15T14:54:11+5:302016-06-15T14:54:11+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या गुन्ह्यातील संशयितास त्याच्या साथीदाराने चपलेतून गांजाच्या पुड्या देण्याचा प्रकार उघडकीस आला़

नाशिक जिल्हा न्यायालयात आरोपीला चपलेतून गांजा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १५ :- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या गुन्ह्यातील संशयितास त्याच्या साथीदाराने चपलेतून गांजाच्या पुड्या देण्याचा प्रकार बुधवारी (दि़१५) दुपारी उघडकीस आला़ या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून चपला व गांज्याची पुड्या ताब्यात घेतल्या आहेत़ या संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे़ गत महिन्यात रिपार्इंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी दुहेरी खुनातील आरोपींना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न करून पोलीस कर्मचाऱ्यस दमदाटी केली होती़ या प्रकरणी लोंढे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)