गँगस्टर पुजारी, शेलारची हातमिळवणी

By Admin | Updated: December 16, 2014 03:38 IST2014-12-16T03:38:13+5:302014-12-16T03:38:13+5:30

गँगस्टर रवी पुजारी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांची हातमिळवणी असल्याचा संशय व्यक्त करून जमीयत उलेमा ए हिन्दचे

Gangster priest, Shelar's assault | गँगस्टर पुजारी, शेलारची हातमिळवणी

गँगस्टर पुजारी, शेलारची हातमिळवणी

मुंबई : गँगस्टर रवी पुजारी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांची हातमिळवणी असल्याचा संशय व्यक्त करून जमीयत उलेमा ए हिन्दचे सचिव गुलाम आझमी यांनी खळबळ उडवून दिली. पत्रकार संघात आझमी यांनी पत्रकार परिषदेत हा संशय व्यक्त केला.
जमीयत ही संघटना अतिरेकी आणि डी कंपनीतल्या गँगस्टरसाठी धडपडते. न्यायालयात अशांसाठी बाजू मांडते. ही धडपड न थांबविल्यास हत्याकांड घडवू, अशी धमकी पुजारीने दिल्याचे आझमी यांनी सांगितले.
मुळात पुजारीची धमकी शनिवारी आली. तर आमदार शेलार यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा बुधवारी उपस्थित केला. त्यांनी जमीयतवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यामुळे या दोघांनी हातमिळवणी करून जमीयतविरोधात षडयंत्र सुरू केल्याचा संशय आहे, असे आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आझमी यांच्या तक्रारीबाबत गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक चौकशी करते आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे जे मार्ग पोलिसांनी आझमी यांना सुरक्षा पुरविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gangster priest, Shelar's assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.