नगरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: August 22, 2016 05:22 IST2016-08-22T05:22:12+5:302016-08-22T05:22:12+5:30
महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सुरू असून शनिवारी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नगरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सुरू असून शनिवारी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली असून, एकजण फरार आहे. घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.
विलास हरिभाऊ वर्पे (रा. बोल्हेगाव, ता. नगर) व विलास शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तरूणीच्या फिर्यादीनुसार, आरोपी वर्पे याने बँकेत नोकरीच्या आमिषाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. शनिवारी वर्पेसह ही तरूणी दुचाकीवर राहुरीहून नगरकडे येत असताना धर्माडी टेकडी येथे तरूणीवर वर्पे याने बलात्कार केला. घटनास्थळी २० ते २५ वयोगटातील दोन युवक आले़ त्यांनी तरुणी व आरोपी वर्पे यास दमदाटी केली़ आम्ही वन विभागाचे कर्मचारी असून आमच्यासोबत रेस्ट हाऊसवर यावे लागेल, असे त्यांनी सांगितले़ तरुणीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. शनिवारी सायंकाळी पीडित तरूणीने तिघांविरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी रविवारी वर्पे यास नगरमधून, तर दुसरा आरोपी विलाश शिंदेला चाकणमधून अटक केली. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हे राहुरी येथे तळ ठोकून आहेत़ (प्रतिनिधी)