बॉयफ्रेंडच्या मदतीने तरुणीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: May 26, 2017 18:31 IST2017-05-26T18:31:21+5:302017-05-26T18:31:21+5:30
मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.

बॉयफ्रेंडच्या मदतीने तरुणीवर सामूहिक बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 26 - मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.
सौरभ शेट्टी, नफीस खान, हर्षल भाटीया अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरळ येथे राहणारी 21 वर्षीय तरुणी मार्च महिन्यात सुट्टीत पिंपरी येथे आजमेरामध्ये राहणाऱ्या आजीकडे आली होती. आजीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाची तिची ओळख झाली. तो तिला फिरायला घेऊन गेला. कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध घालून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने ही माहिती मित्रांना सांगितली. त्यानंतर तिघांनी संगणमत करून गुंगीचे औषध देऊन पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार नेहरुनगर परिसरातील एमआयडीसीत केला.
या घटनेनंतर त्या मुलीला वेदना होऊ लागल्याने ती आजारी पडली. आजीने तिला नेरळला सोडले. आईवडिलांनी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्या मुलीने झालेला सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला. आईवडिलांनी याबाबत नेरळ पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंदविण्यात आला. हा गुन्हा तपासासाठी पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.