सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: November 1, 2014 00:25 IST2014-11-01T00:25:58+5:302014-11-01T00:25:58+5:30

बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Gangrape on minor girl in Sangli | सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सांगलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पलूस (सांगली) : बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. चौथा संशयित दुस:या एका बलात्काराच्या गुन्ह्यात यापूर्वीच अटकेत आहे.
अरविंद पंडित पवार (28), पंकज पांडुरंग पवार (19), सचिन पोपट जाधव (2क्) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चौथा संशयित प्रशांत शहाजी पाटील (19) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. चौघेही संशयित पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक आहेत.
पीडित मुलीचे वडील व्यसनी असून आईचे निधन झाले आहे. तिची गरिबी आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन संशयितांनी एक वर्षापासून तिचे लैंगिक शोषण केले आहे. पीडित मुलीने हा प्रकार कोणास सांगू नये यासाठी तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. परंतु या लैंगिक शोषणातून संबंधित मुलीस गर्भधारणा झाली आणि तिने मुलीला जन्म दिला. शुक्रवारी तिने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. (वार्ताहर)

 

Web Title: Gangrape on minor girl in Sangli