पुण्यात आयटी पार्कमधल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: February 28, 2016 14:31 IST2016-02-28T13:11:27+5:302016-02-28T14:31:28+5:30
पुण्यात आयटी पार्कमध्ये नोकरी करणा-या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात आयटी पार्कमधल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - पुण्यात हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये नोकरी करणा-या एका तरुणीवर ऑफीसमधल्या सहका-याने मित्राच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे ऑफीसमधल्या सहका-याने मित्रांच्या मदतीने पार्टीत बेशुध्द करुन तरुणीवर बलात्कार केला.
हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच ऑफीसमध्ये कामाला आहेत.
आरोपीने पीडित तरुणीला पार्टीसाठी बोलावले होते. पार्टीमध्ये त्याने तरुणीला पिण्यासाठी शीतपेय दिले. या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे शीतपेय पिल्यानंतर तरुणी बेशुध्द पडली.
त्यानंतर आरोपी आणि त्याचे मित्र तरुणीला धानोरीतल्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे मुंढवा पोलिस स्थानकात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.